10 तुन सैन्यसमां पारसी, लुदी अनी पुटी हया तुना लढाई करनारा व्हतात; त्या तुनामां आपल्या ढाली अनी शिरस्राण टांगेत; त्या तुला तेजस्वी करेत. 11 अर्वदना माणसे तुना सैन्यसनीसंगे तुना तटवर आजुबाजूले राहेत; तुना बुरुजवर शुर माणसे राहेत; त्या तुना तटवर चारीमेर आपल्या ढाली टांगीसनं तुले सौंदर्ययुक्त करेत.
12 "सर्वा परकारनं माल तुनाजोडे भरपुर राहे त्यामुये तार्शीश तुनासंगे व्यापार करे; तुना मालना मोबदला त्या पैसा, लोखंड, कथील अनी शिसा देयेत. 13 यावान, तुबाल अनी मेशेख हया तुनासंगे व्यापार करेत; तुना मालना मोबदला म्हनीसनं त्या तुले माणसे अनी पितयना भांडे देयेत. 14 तोगार्माना वंश तुना मालना मोबदला म्हनीसनं तुले घोडा, स्वारीना घोडा अनी खेचर देयेत. 15 ददानी लोके तुनासंगे व्यापार करेत; बराच व्दिपे त्यासले व्यापारकरता सोयीना राहेत; त्या तुना मालना बदलामां तेल हत्तीसना दात शिंग अनी अबनुस देयेत. 16 तुना कारागीरना पदार्थ बहुविध राहावामुये अरामी लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले पाच, जांभया रंग, तागना वेलबुटिदार उत्तम कपडा, प्रवाळ अनी मानके देयेत. 17 यहुदा अनी इस्त्राएल देशमासला लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले मिन्नीथाना गहू, मेवामिठाई, मध, तेल अनी उद देयेत. 18 तुना कारागीरना माल बराच राहावामुये अनी बठा परकारनं माल तुनाजोडे बराच राहावामुये दिमिष्क तुनासंगे व्यापार करेत अनी मालना बदलामां तो तुले हेल्बोनना द्राक्षरस अनी पांढरी लोकर देये. 19 वदान अनी यावानना लोक या तुना माल लिसन तुले सुत देयेत; पोलाद, तज अनी अगरु हाई तुना व्यापारना मालपैकी राहे. 20 ददान तुनासंगे व्यापार करीसनं तुले स्वारीना साज पुराये. 21 अरबस्तान अनी केदारना सर्वा सरदार व्यापारनीबारामां तुनी मुठीमां राहेत; कोकरा, एडका अनी बोकडया यासना त्या तुनासंगे सौदा करेत. 22 शबा अनी रामा आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना माल लिसनं त्या तुले परतेक परकारनं मसाला, जवाहीर अनी सोना देयेत. 23 हारन, कन्ने, एदेन, शबा, अश्शुर अनी किल्मद आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत, 24 त्या तुना माल लिसनं उत्तम कपडा, जांभया अबू वेलबुटीदार झगा, उचा कपडाना पेठा अनी वयेल टिकावू दोर्या हया व्यापारन्या वस्तु तुले देयेत. 25 तार्शीशना जहाज तुना मालनी ने आन करनारा जनु काय काफेलाच व्हतात;
35 "समुद्रना काठना बठा लोके तुले दखीसनं विस्मित व्हयी जायेल शेतस; त्यासना राजा थरथर कापी राहीना शेतस; त्यासना तोंडे काळं पडी जायेल शेतस. 36 राष्ट्रसमासला व्यापारी तुना धिक्कार करतसं; तुनी दशा दखीसनं लोकेसले दहशत पडेल शे; तु कायमनी नष्ट व्हयी जायेल शे."
<- यहेज्केल 26यहेज्केल 28 ->
Languages