1 त्यानी होमवेदी बाभुळना लाकडासनी बनाडी; तिनी लांबी पाच हात अनी रुंदी पाच हात आशी ती चौरस राहीसनी तिनी उंची तीन हात व्हती. 2 त्यानी तिन्या चारी कोपरासले चार शिंग बनाडं; ती तिनं आंगनं व्हतं; त्यानी हाई वेदी पितळघाई मढावं. 3 अनी त्या वेदीना बठा भांड म्हणजे हंडया, पावडी, कटोरं, काटे, आगपात्र हाई बठा पितळनं बनाडं. 4 वेदीले त्यानी आजुबाजूले गोटासना खाल पितळनं जाळीनं एक चाळन करं, ती वेदीना खालतीन तिना अर्धा उचीपावोत व्हती. 5 त्यानी पितळनं चाळनीनं चारी कोपरासले दांडया घालाकरता चार कडया वतीसनी तयार कर्यात. 6 त्यानी बाभुळना लाकडासना दांडया करीसनी ते पितळघाई मढावं. 7 वेदी उचलाकरता तिन्या बाजुना कडयासमा त्यानी दांडया घालात; मजारमा पोकळ ठेयीसनी बाजुले फया बसाडेल वेदी बनाडी.
8 त्यानी हौद अनी त्यानी बैठक पितळनी बनाडी; दर्शनमंडपना दारपान ज्या बाया सेवा करेत त्यासना आरशानी हाई पितळ व्हती.
9 त्यानी आंगन तयार करं; त्याना दक्षिण बाजुले तलम सणनं ईनेल पडदा बठा शंभर हात व्हतात. 10 त्यासले वीस खांब व्हतात अनी त्या खांबासले पितळन्या वीस खाचा व्हत्या; खांबासना आकडा अनं त्यान्या रोहाड चांदीन्या व्हत्यात. 11 त्यान्या उत्तर बाजुले शंभर हात लांबीन पडदा व्हतात; त्या धरीसनी वीस खांब राहीसनी त्यासले पितळन्या वीस खाचा व्हत्यात; खांबासना आकडा अनी त्यानी रोहाड चांदीन्या व्हत्यात. 12 अनी पश्चिम बाजुले पन्नास हात लांब पडदा व्हतात; त्यासले दहा खांब अनी दहा खाचा व्हत्या; या खांबासना आकडा अनी रोहाड चांदीन्या व्हत्यात; 13 पुर्व बाजुले पन्नास हात ठेवं 14 आंगणना दारनं एक बाजुले पंधरा हात लांबनं पडदा व्हता, त्याना खांब तीन अनी खाचाबी तीन व्हत्या 15 अनी आंगणनी दुसरी बाजुबी तशीच व्हती; आंगणनं दारनी हाई बाजु अनी त्या बाजुले पंधरा पंधरा हात पडदा व्हतात, त्याना खांब तीन अनी खाचा तीन तीन व्हत्या 16 आंगणना आजुबाजूना बठा पडदा कातेल तलम सणसना कापडनं व्हतं. 17 खांबन्या खाचा पितळनं अनी त्यासना आकडा अनी त्यासनी रोहाड चांदीनी व्हती; त्यासना मथळा चांदीना मढायेल व्हतात अनी आंगणनं बठा खांब चांदीना रोहाडघाई जोडेल व्हतात. 18 आंगणना दारना पडदा वेलबुट्टीदार राहीसनी निया, जांभळा अनी किरमिजी रंगना सुतनं अनी कातेल तलम सणसना कापडासना व्हतात; त्यासनी लांबी वीस हात अनी त्यानी रुंदीकडली उची आंगणनं काठना इतली पाच हात व्हती. 19 त्याना खांब चार अनी त्यासले पितळनं खाचा चार व्हत्या; त्यासना आकडा चांदीना राहीसनी त्यासना मथला चांदीना मढायेल व्हतं अनी त्यासनी रोहाड चांदीनी व्हती. 20 निवासमंडपना अनी आंगणन्या आजुबाजूना बठा खुट्या पितळन्या व्हत्यात.
Languages