7 अहश्वेरोश राजाना कारकीर्दीना बारावा वरीसले त्यासनी पहिला म्हणजे निसान महिनापाईन हामाननासमक्ष चिठया टाकाले लायात. हाऊ क्रम दररोज, दरमहिनाले, बारावा महिना अदार संपापावत चालू राहिना.
8 हामान अहश्वेरोश राजाले बोलना, “आपला साम्राज्यमाधला सर्वा प्रांतामाईन राहनारा देशदेशना लोकसमा पांगेल अनं विखरेल एक राष्ट्र शे; त्या लोकेसना कायदा इतर सर्वा लोकसना कायदापेक्षा येगळा शेतस. त्या राजाना कायदाप्रमाणे चालतस नही म्हणीन त्यासले राहू देवानं राजाना हितना नही शे. 9 राजानी मर्जी व्हई तर त्यासना नाश करानं अशी आज्ञा लिखानी; राजभांडारमा गोया कराकरता मी दहा हजार चांदीना शिक्का राजाना कारभारीसना हातमा देस.”
10 तवय राजानी आपली आंगठी बोटमाईन काढीन यहूदीसना शत्रु हामान बिन हम्मदाथा याले दिधी. 11 राजानी हामानले सांगं, तुले चांदी देल शे अनं लोकं बी देल शेतस; तुले वाटी तसं त्यासनं कर.
12 तवय पहिला महिनाना त्रयोदशीस राजानं लेखकसले बोलवामा वनात अनी राजानं प्रतिनिधि, प्रत्येक प्रांतना सुभे अनं सगया लोकसना सरदार यासले हामानना सांगेल प्रमाणे प्रत्येक प्रांतना लिपीक अनं प्रत्येक जातीना लोकसना भाषामा खलिते लिखीन धाडामा वना. अहश्वेरोश राजाना नावतीन ते लिखीन त्यानावर राजानी आंगठीना मोहर करेल व्हती. 13 राजाना सर्वा प्रांतप्रांतमाईन जासूदसना हाततीन अश आशयानी पत्रं धाडामा वनं की, एकच दिनले म्हणजे बारावा अदार महिनाना त्रयोदशीसले म्हातारा, जवान, बाया, पोऱ्या अश सर्वा यहूदी लोकसना विध्वंस अनं नायनाट कराना अनं त्यासनी धनसंपत्ती लुटी लेवानी. 14 हाई आज्ञा पत्रसन्या प्रत सर्वा प्रांतासमा खुल्या धाडात. त्या अशा हेतूतीन की सर्वा लोकसनी त्या दिनले तयार रावाले पाहिजे. 15 हाऊ हुकूम शूशन राजवाडामा देवामा वना अनी राजआज्ञा मानीसन जासूद लगेच निंघी गयात; त्या येळले राजा अनं हामान ह्या पेवाले बसनात; पन शुशन नगर चिताक्रांत व्हयनं.
<- एस्तेर 2एस्तेर 4 ->
Languages