9 [a]मी तठे असतानाच त्यासना समोर अमोरीसना नाश करा, ज्यासनी उंची गंधसरूनामायक व्हती; त्या अल्लोन झाडनामायक ताकतवर व्हतात. पण मी त्यासनावरला फळसना अनं खालतीन मुळना नाश करा. 10 तुमले मिसरमाईन आणणारा मीच शे अनी चाळीस वरीस मीच तुमले वाळवंटसमाईन काढी आणं ह्याकरता की अमोरीसना प्रदेश तुम्हीन ताबामा करानं.
11 [b] मी तुमनापैकी काही पोऱ्यासले संदेष्टा व्हवाकरता अनी तुमनामाधला काही तरुणसले [c]नाजीर व्हवाकरता वाढावसू, हे इस्राएल लोकसवन। अश नही शे का? अश परमेश्वर सांगस.
12 पण तुम्हीन नाजीरसनं मन वळाईसन मद्य पेवाले लावं, अनी संदेष्टासले भविष्य सांगानं नही, आशी आज्ञा करी.
13 दखा, जशा पेंढयासनी भरेल गाडी एखादाले दाबी टाकस, त्यानाच मायक मी तुमले दाबी टाकसू.
14 चालाक व्यक्ती सुटाव नही, जो ताकतवर शे त्यासले आपली शक्ती लावता येवाव नही, वीरले स्वत:ना जीव वाचाडता येवाव नही.
15 धनुरधारीले उभं राहता येवाव नही. अनी जोरमा पळनारा सुटाव नहीत; घोडा चालवनाराले आपला जीव वाचाडता येवाव नही.
16 वीरसमा जो धैर्यवान तोच त्या दिनले उघडा पळी जाई अश परमेश्वर सांगस.
<- आमोस 1आमोस 3 ->
Languages