1 शौल आते बी प्रभुना शिष्यसले धमक्या देनं अनी त्यासनी हत्या करानी याच धुनमा व्हता; तो महायाजककडे गया, 2 अनी त्यासनाकडतीन दिमिष्क शहरमधला धर्मसभाकरता असा पत्र मांगात की, जर तठे या पंथना माणसे किंवा बाया दखायनात म्हणजे तो त्यासले बांधीन यरूशलेममा लई ई.
3 मंग जाता जाता अस व्हयनं की तो दिमिष्क जोडे पोहचना, तवय अचानक त्याना आजुबाजू आकाशमातीन प्रकाश चमकना. 4 तवय तो जमीनवर पडना, अनी त्यानी असा आवाज आपलासंगे बोलतांना ऐका, “शौल, शौल! तु मना छळ का बरं करस?”
5 तवय तो बोलना, “प्रभु तु कोण शे?”
7 त्यानासंगे ज्या लोके जाई राहींतात त्या स्तब्धच उभा राहीनात, त्यासनी आवाज ऐका खरा; पण त्यासले कोणीच दिसनं नही. 8 मंग शौल जमीनवरतीन ऊठना तवय त्याना डोया उघडाच व्हतात, तरी बी त्याले काहीच दखाई नही राहींत; तवय त्या त्याले हात धरीसन दिमिष्क शहरमा लई गयात. 9 तठे तो तिन दिन आंधया व्हता अनी तितला दिन त्यानी काहीच खादं पिधं नही.
10 तठे दिमिष्क शहरमा हनन्या नावना कोणी एक शिष्य व्हता; त्याले प्रभु दृष्टांत दिसन बोलना, “हे हनन्या!”
11 प्रभुनी त्याले सांगं, ऊठीसन नीट नावनी वाटवर जा अनी यहुदाना घर तार्सकर शौल नावना माणुसना शोध कर; कारण दख तो प्रार्थना करी राहीना. 12 अनी त्यानी दृष्टांतमा अस दखं की, कोणी तरी हनन्या नावना माणुस मझार ईसन बरं व्हवाकरता आपलावर हाथ ठि राहीना.
13 तवय हनन्यानी उत्तर दिधं, “प्रभु, यरूशलेममधला तुना पवित्र लोकसनं ह्या माणुसनी कितलं वाईट करेल शे, हाई मी बराच लोकसकडतीन ऐकेल शे. 14 अनी आठे बी तुनं नाव लेनारा सर्वासले बांधानं, असा मुख्य याजकसकडतीन त्याले अधिकार भेटेल शे.”
15 तवय प्रभुनी त्याले सांगं, “जाय, कारण गैरयहूदी लोकेसपुढे, राजासपुढे अनं इस्त्राएल लोकसपुढे मनं नाव लई जावाकरता त्याले मी निवाडेल शे. 16 अनी त्याले मना नावकरता कितलं दुःख सहन करनं पडी हाई मी त्याले दखाडसु.”
17 तवय हनन्या जाईसन त्या घरमा घुसना अनी त्यानावर हात ठिसन बोलना, “शौल भाऊ, तु वाटतीन ई राहींता तवय ज्या प्रभुनी म्हणजे येशुनी तुले दर्शन दिधं, त्यानी माले यानाकरता धाडं की, तुले परत दखावाले पाहिजे अनी तु पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हवाले पाहिजे.” 18 तवय लगेच शौलना डोयावरतीन खिपल्यासनामायक काय तरी पडनं अनी त्याले दखावु लागनं; त्यानी ऊठीसन बाप्तिस्मा लिधा; 19 अनी जेवण करावर त्यानामा परत बळ वनं. मंग शौल दिमिष्क शहरमधला शिष्यसना सहवासमा काही दिन राहीना.
21 तवय सर्वाजन आश्चर्यचकीत व्हईन बोलु लागनात, “हाई येशु नाव लेनारासले जो यरूशलेम शहरमा मारी राहींता तो हाऊच ना? हाऊ तर त्या लोकसले बांधीन मुख्य याजकसकडे लई जावाले आठे येल व्हता ना?”
22 पण शौल हाऊ आखो सामर्थ्यशाली व्हत गया, अनी येशु हाऊच ख्रिस्त शे असा तो पुरावा दिसन दिमिष्कमा राहणारा यहूदी लोकसले आश्चर्यचकीत करं.
23 [a]असा बराच दिन व्हई गयात, मंग यहूदी लोकसनी शौलले मारी टाकाना ईचार करा. 24 पण शौलले त्यासना ईचार समजना, त्यासनी त्याले मारी टाकाकरता रातदिन शहरनी वेशीवर नजर ठिन व्हतात. 25 पण त्याना शिष्यसनी शहरनी जी भिंत व्हती तिनी खिडकीमातीन त्याले टोपलीमा बसाडीन खाल उतारी दिधं.
31 शेवट अशी सर्व यहूदीया, गालील अनी शोमरोन या प्रदेशमातील मंडळीसले शांतता भेटनी, अनी त्यासनी वाढ व्हत गई अनी त्या प्रभुना भय धरीन अनं पवित्र आत्मानी देयल समाधानमा वाढत गयात.
36 आखो यापो शहरमा तबीथा नावनी एक शिष्य व्हती, ग्रीकमा दुर्कस अस म्हणतस त्याना अर्थ हरीण व्हस, ती चांगला कामे करामा अनं दानधर्म करामा कायम तयार राहे. 37 पुढे त्या दिनसमा ती आजारी पडीन मरी गई; तवय त्यासनी तिन आंग धोईन माडीवर एक खोलीमा ठेवं. 38 लोद हाई यापो शहरजोडे व्हतं, तठे पेत्र शे अस शिष्यसनी ऐकं, तवय त्यासनी दोन जणसले धाडीन त्याले ईनंती करी की, “आमनाकडे येवाले उशीर करू नका.” 39 तवय पेत्र ऊठीसन त्यासनासंगे गया तो तठे पोहचताच त्या त्याले माडीवर ली गयात; त्याना आजुबाजू सर्व विधवा रडी राहिंत्यात अनी ज्या सदरा अनी कपडा दुर्कसनी जिवत व्हती तवय बनाडेल व्हतात, त्या त्याले दखाडु लागनात. 40 पण पेत्रनी त्या सर्वासले बाहेर काढं अनी गुडघा टेकीन प्रार्थना करी अनी मरेल शरिरकडे दखं अनं फिरीसन बोलना, “तबीथा, ऊठ.” तवय तिनी डोया उघडात अनी पेत्रले दखीसन ती ऊठी बसनी. 41 मंग त्यानी तिले हात धरीन ऊठाडं अनी ईश्वासी लोकसले अनं विधवासले बलाईन त्यासनापुढे तिले जिवत अस उभं करं. 42 मंग सर्व यापोमा हाई माहीत पडनं अनी बराच जणसनी प्रभुवर ईश्वास ठेवा. 43 नंतर अस व्हयनं की, पेत्र यापो शहरमा शिमोन नावना एक चांभारना घर बराच दिन राहीना.
<- प्रेषित 8प्रेषित 10 ->- a ९:२३ २ करिंथ ११:३२,३३
Languages