22 तवय लोकसनी गर्दी पौल अनं सीलावर ऊठनी, अनी अधिकारीसनी त्यासना कपडा फाडीन त्यासले फटका मारानी आज्ञा दिधी. 23 मंग त्यासले बराचसा फटका मारानंतर कैदखानामा टाकी दिधं अनी त्यासले कडक बंदोबस्तमा ठेवानं असा कैदखानाना अधिकारीले हुकूम करा. 24 असा त्याले हुकूम मिळानंतर त्यानी त्यासले मधला कैदखानामा टाकीन त्यासना पाय लाकुडना ओंडकामा आटकाडात.
25 जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात. 26 तवय अचानक असा मोठा भूकंप व्हयना की कैदखानाना पाया डगमगना; सर्व दारे लगेच उघडनात अनी सर्व कैदीसना साखळबंद सुटी गयात. 27 तवय कैदखानाना अधिकारीनी झोपमाईन जागा व्हईसन कैदखानाना दारे उघडा दखात अनी कैदी पळना व्हतीन अस समजीसन तलवार काढीन तो स्वतःना घात करणार व्हता. 28 ईतलामा पौल जोरमा वरडीन बोलना, “तु स्वतःनं काय करी लेवु नको, कारण आम्हीन सर्व आठेच शेतस!”
29 मंग दिवा लाईन तो अधिकारी मझार धावत गया अनी कापत कापत पौल अनी सीला यासन्या पाया पडना. 30 अनी त्यासले बाहेर काढीन बोलना, “महाराज, मनं तारण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी काय कराले पाहिजे?”
31 त्या बोलनात, “प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई.” 32 त्यासनी त्याले अनी त्याना घरमातील सर्वासले प्रभुनं वचन सांगं. 33 मंग रातनी तीच येळले त्यानी त्यासन्या जखमा धुयात अनी तवय त्यानी अनी त्याना घरना सर्वासनी बाप्तिस्मा लिधा. 34 मंग त्यानी त्यासले घर लई जाईसन जेवण दिधं अनी देववर ईश्वास ठिसन सर्व कुटूंबसंगे आनंद करा.
35 दिन उगानंतर रोमी अधिकारीसनी शिपाईसले सांगीन धाडं की, “त्या माणससले सोडी द्या.”
36 तवय कैदखानाना अधिकारीनी पौलले अस वर्तमान सांगं की, “तुमले सोडाव म्हणीसन अधिकारीसनी माणसे धाडेल शेतस, तर आते शांततामा निंघी जा.”
37 तवय पौल त्याले बोलना, “आम्हीन रोमी माणसे व्हतुत अनी अपराधी ठरनुत नही तरी त्यासनी आमले लोकसना समोर फटका मारीन कैदखानामा टाकं अनी आते त्या आमले गुपचुप धाडी राहीनात का? अस नही; तर त्यासनी स्वतः ईसन आमले बाहेर लई जावं.”
38 मंग शिपाई अधिकारीनी हाई बातमी रोमी अधिकारीसले सांगी, तवय त्या रोमी शेतस, अस ऐकीसन त्यासले भिती वाटनी. 39 मंग त्यासनी ईसन त्यानी समजुत करी अनी त्यासले बाहेर आणीन शहरमातीन निंघी जावानी ईनंती करी. 40 मंग पौल अनी सिला कैदखानामातीन निंघीन लुदियाना घर गयात, ईश्वासु बंधुवर्गाले भेटीन त्यासनी त्यासनं समाधान करं, अनी तठेन त्या वाटले लागनात.
<- प्रेषित 15प्रेषित 17 ->- a 16:1 हेल्लेणी ग्रीक
Languages