6 यामुये आम्हीन कायम हिम्मत ठेवतस, अनी हाई बी ध्यानमा ठेवतस की जोपावत आम्हीन शरिरमा राहतस जे आमनं जगीक घर शे, तोपावत प्रभुनापाईन दुर शेतस. 7 आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही. 8 आम्हीन धैर्य धरतस, अनी शरिरना बाहेरना प्रवासी राहिसन बी प्रभुनासंगे स्वर्गीय घरमा ऱ्हावाले आमले अधिक चांगलं वाटस. 9 यामुये आम्हीन पृथ्वीवर राहीनुत किंवा त्यानासंगे राहिनुत तरी त्याले खूश करानी आमनी हौस शे. 10 [a]कारण आपले सर्वासले ख्रिस्तना न्यायासनना पुढे खरा अर्थतीन प्रकट व्हवाले पाहिजे, यानाकरता की त्यानी प्रत्येकले, त्यानी शरीरतिन करेल गोष्टीसनं फळ मिळाले पाहिजे; मंग त्या चांगल्या राहोत नही तर वाईट राहोत.
16 आत्तेपाईन आम्हीन कोणले मनुष्यना समजनुसार वळखतस नही; अनी जरी आम्हीन ख्रिस्तले मनुष्यना समजनुसार वळखेल व्हतं तरी आते त्याले यानापुढे तसं वळखतस नही. 17 जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. 18 हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. 19 म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
20 यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस. 21 ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.
<- २ करिंथ 4२ करिंथ 6 ->- a ५:१० रोम १४:१०
Languages