7 प्रकटीकरणना अधिकतामुये मी गर्व कराले नको म्हणीसन मना शरिरमा एक काटा, माले बुक्की मारा करता एक सैतानना दूत ठेवामा येल शे; मी गर्व कराले नको म्हणीसन तो ठेवामा येल शे. 8 हाऊ मनापाईन दुर व्हवाले पाहिजे अशी मी प्रभुजोडे तीनदाव ईनंती करी. 9 पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस. 10 ख्रिस्तनाकरता अशक्तपण, अपमान, अडचण, तरास, संकट भोगनं यामा मी खूश शे; कारण मी अशक्त शे तवय मी सशक्त शे.
14 तिसरींदाव मी तुमनाकडे येवाले तयार शे अनी मी तुमले बोझ व्हवावु नही, मी तुमना कडतीन काहीच मांगस नही तर तुम्हीन स्वतःच माले पाहिजे; पोरसनी मायबापसकरता नही तर मायबापसनी पोऱ्यासकरता धन गोया कराले पाहिजे. 15 मी तुमना जिवकरता भलताच आनंदतीन खर्च करसु अनी मी स्वतः खर्च व्हई जासु; मी तुमनावर भलतच प्रेम करस म्हणीसन तुम्हीन मनावर कमी प्रेम करतस का?
16 असो, मी तुमनावर वझ टाकं नही; तरी मी धुर्त व्हतु म्हणीसन तुमले कपटतीन पकडं. 17 ज्यासले मी तुमनाकडे धाडं त्यामातील एक कडतीन तरी मी तुमना कडतीन स्वार्थ साधी लिधा का? 18 मी तिताले ईनंती करी, अनी त्यानासंगे एक भाऊले धाडं; तवय तितानी तुमना कडतीन स्वार्थ साधी लिधा का? आम्हीन एकच आत्मातीन मायकच उद्देशतीन चालनु नही का?
19 आम्हीन स्वतःले वाचाडी राहीनुत अस ईतला येळ तुमले वाटनं व्हई, तर नही आम्हीन देवसमक्ष ख्रिस्तमा बोली राहीनुत; प्रिय भाऊसवन, तुमनी प्रगती करता हाई सर्व शे. 20 माले भिती वाटी राहीनी की, मी येवावर, जशी मनी ईच्छा शे तसा तुम्हीन माले दखावणार नही अनी तुमनी अपेक्षा नही तसा मी तुमले दखावसु; कदाचित भांडणं, हेवा, राग, फुट, चुगल्या, निंदा, रूसवा, अव्यवस्था या माले दखायतीन. 21 मी परत येवावर मना देव माले तुमनापुढे खाल दखाले लाई अनी ज्यानी पुर्वी पाप करीसन स्वतः आचरण करेल अशुध्दपणा, जारकर्म अनी व्यभिचारपणना पश्चाताप करा नही असा बराच लोकसबद्दल माले शोक करना पडी.
<- २ करिंथ 11२ करिंथ 13 ->
Languages