10 [a]लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. 11 सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
12 बाकिनासले प्रभु नही मी सांगस, जर एखादा भाऊले ईश्वासहिन बायको शे, अनी ती त्यानासंगे नांदाले तयार शे, तर त्यानी तिले सोडानं नही. 13 ज्या बाईले अईश्वासु नवरा शे तो जर तिनासंगे ऱ्हावाले तयार शे, तर तिनी त्याले सोडानं नही. 14 कारण बायकोकडतीन अईश्वासु नवरा पवित्र व्हयेल शे, अनी नवराकडतीन बिनईश्वासु बायको पवित्र व्हयेल शे; अस नसतं तर तुमना पोऱ्यासोऱ्या अशुध्द राहतात; पण आते त्या पवित्र शेतस. 15 जर अईश्वासु व्यक्तीनी वेगळी व्हवानी ईच्छा शे त्यानी वेगळं होऊ द्या, असा परिस्थीतिमा भाऊ किंवा बहिण बांधेल नही शेतस, पण देवनी आपलाले शांतीमा ऱ्हावाले बलायेल शे. 16 हे पत्नी, तु तुना नवराले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का? हे पती, तु तुनी पत्नीले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का?
29 भाऊसवन, मी हाईच म्हणस; येळ कमी करामा येल शे, याकरता की आतेपाईन ज्यासले बायका शेतस, त्यासनी अस ऱ्हावाले पाहिजे जश त्यासले बायको नही; 30 ज्या रडतस त्यासनी रडतस नही, ज्या आनंद करतस त्यासनी आनंद नही करतस; ज्या विकत लेतस त्यासनी आपलाजोडे काहीच नही; 31 अनं ज्या जगना उपयोग करतस त्यासनी आपण त्याना उपयोग नही करतस अस ऱ्हावाले पाहिजे; कारण या जगनं रूपांतर व्हई राहीनं.
32 तुम्हीन निश्चित ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे, बिन लगीन व्हयेल माणुस, प्रभुले कश खूश करानं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस. 33 पण लगीन व्हयेल माणुस, आपली बायकोले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करस; 34 लगीन व्हयेल अनं बिन लगीन व्हयेल बाई यासनामा बी फरक शे. बिन लगीन व्हयेल ऱ्हास ती शरीरतिन अनं आत्मातीन बी कश पवित्र व्हवाणं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस; पण लगीन व्हयेल ऱ्हास ती आपण आपला नवराले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करतस.
35 हाई मी तुमना चांगला करता सांगस; तुमनावर फास टाकाकरता नही, तर तुमना हातघाई उत्तम तेच व्हवाले पाहिजे अनं प्रभुनी सेवा एकचित्ततीन व्हवाले पाहिजे.
36 जर कोणले अस वाटस की, तो त्याना कुवारी पोरना अपमाननं कारण व्हई राहीना, ती उपवर व्हयेल शे अनी तसा अगत्यच शे, तर जशी ईच्छा व्हई तसं त्यानी करानं, तो पाप करस नही, त्यानी लगीन करी लेवानं. 37 पण ज्यानी कुवारीसंगे लगीन नही कराना निर्णय लियेल शे, ज्याले कसानी बळजबरी नही अनं ज्यानी ईच्छावर सत्ता शे अनी अस ज्यानी मनमा ठरायेल शे तो चांगलं करस. 38 म्हणीसन जो कुवारी पोरंन लगीन करी देस तो चांगला करस, पण लगीन करी देस नही तो अधिक चांगला करस. 39 नवरा जिवत शे तोपर्यंत बायको बांधेल शे; नवरा मरानंतर तिनी ईच्छा शे त्यानाबरोबर, पण फक्त प्रभुमा लगीन कराले मोकळी शे; 40 जर ती लगीन न करता तशीच ऱ्हायनी तर मना ईचारतीन ती जास्त सुखी राही; अनी माले वाटस, देवना आत्मा मनामा बी शे.
<- १ करिंथ 6१ करिंथ 8 ->- a ७:१० मत्तय ५:३२; १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८
Languages